Pune News : भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज : भरधाव वेगातील टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. मुंबई बंगलोर महामार्गावरील अरे गावाजवळ हा अपघात झाला. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बबीता लुंबाराम सुतार (वय 53) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर लंबाराम सुतार हे जखमी झाले आहेत. टेम्पो चालक गोविंद सिंग (वय 43) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अर्जुन लुंबाराम सुतार यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की लुंबाराम सुतार आणि बबिता सुतार दुचाकीने जात होत्या. नरे गावाजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून टेम्पोने जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने बबिता यांचा मृत्यू झाला तर लूंबाराम हे जखमी झाले आहेत. सिंहगड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून टेम्पो चालकाला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.