Chinchwad News : टेम्पोची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एकजण जखमी

एमपीसी न्यूज – ग्रेड सेपरेटर मधून वळताना एका टेम्पोची दुचाकीला धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (बुधवारी, दि. 6) सकाळी नऊ वाजता एम्पायर इस्टेट पुलाजवळ चिंचवड येथे झाला.

एम्पायर इस्टेट पुलाच्या जवळ मेट्रोचे काम सुरु आहे. दरम्यान या कामामुळे जुना पुणे मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल आणि वळण देण्यात आले आहेत. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पिंपरीकडून पुण्याकडे जाणारा एक 407 टेम्पो एम्पायर इस्टेट पुलाच्या खालच्या बाजूला ग्रेड सेपरेटरमधून महामार्गावर वळण घेत होता. त्यावेळी टेम्पोची एका दुचाकीला धडक बसली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, महामार्गावर वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागल्या. पिंपरी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत टेम्पो बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. काही वेळ महामार्गावरील वाहतूक मंदावली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.