Pune News : धायरी ब्रिजजवळ टेम्पोची ज्येष्ठ नागरिकाला धडक, उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील धायरी ब्रिजजवळ रिव्हर्स घेत असताना टेम्पोचे चाक पायावरून गेल्याने जखमी झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 22 ऑगस्ट रोजी हा अपघात झाला होता. त्यानंतर एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

नवलिंग महादेव दुर्गे (वय 65) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी टाटा टेम्पो च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 22 ऑगस्ट रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास टेम्पो रिव्हर्स घेत असताना नवलिंग दुर्गे यांच्या पायावरून त्याचे चाक गेले होते. यावेळी टेम्पोच्या सायलेंसरमुळे त्यांच्या उजव्या पायाला भाजल्यामुळे गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान उपचार सुरू असताना त्यांना झालेल्या दोन्ही जखमांमुळे त्यांच्या पायाला झालेल्या सेप्टीक मुळे ऑपरेशन करून त्यांचा उजवा पाय कापावा लागला.

परंतु तरीही उपचार सुरू असताना अखेर नवलिंग दुर्गे यांचा मृत्यू झाला. सिंहगड रस्ता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.