Pimpri : रेल्वेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून तरुणाची दहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – रेल्वे खात्यामध्ये नोकरी लावते, असे सांगून एकाने तरुणांकडून दहा लाख रुपये घेतले. मात्र नोकरी लावली नाही. यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मोरवाडी पिंपरी येथे घडला.

विशाल संजय शिंदे (वय 23, रा. देडगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर) या तरुणाने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुनील राजेंद खापरे (वय 32, रा. सेलू वॉर्ड क्रमांक तीन, ता. सेलू, जि. वर्धा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरवाडी पिंपरी मधील सुखवानी फॉर्च्युन तिसरा मजला येथील 17 नंबर दुकानात आरोपी सुनील बसत होता. सुनील याने विशालला रेल्वे खात्यात नोकरी लावतो, त्यासाठी पैसे भरावे लागतील, असे सांगितले. विशाल साठी नोकरी मिळणे महत्वाचे होते. त्यामुळे त्याने त्यासाठी होकार दिला. यानुसार सुनील याने 25 एप्रिल 2017 ते 9 नोव्हेंबर 2017 दरम्यान वेळोवेळी विशाल कडून दहा लाख रुपये घेतले. त्यानंतर विशाल याने नोकरी लावण्याची मागणी केली. परंतु सुनील याने विशाल याला रेल्वे खात्यात नोकरी दिली नाही. आपली फसवणूक झाली आहे, असे लक्षात येताच विशालने पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानुसार सुनील याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.