Pune News : दहा महिन्यानंतर केळकर संग्रहालय पुन्हा पर्यटकांसाठी खुले

एमपीसी न्यूज : कोरोनामुळे मागील दहा महिन्यांपासून बंद असलेले शहरातील राजा दिनकर केळकर संग्रहालय पर्यटकांसाठी रविवारपासून पुन्हा खुले झाले आहे.

संग्रहालयातील कर्मचारी अभ्यासक आणि काही पुणेकर यांच्या उपस्थितीत राजा दिनकर केळकर संग्रहालयाची दरवाजे पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. तब्बल दहा महिन्यानंतर अनेक पुणेकरांनी पहिल्या दिवशी संग्रहालयातील वस्तू पुन्हा एकदा न्याहाळल्या.

राज्यातील पर्यटन स्थळ आणि संग्रहालय सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर मूर्ती शास्त्राचे गाढे अभ्यासक आणि संग्रहालयाचे व्यवस्थापन मंडळाचे तज्ञ डॉक्टर गो ब देगलूरकर यांच्या हस्ते संग्रहालयाचे प्रवेशद्वार प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले.

या संग्रहालयाचे संस्थापक डॉक्टर दि ग केळकर यांनी 1920 आली संग्रहालयाची पहिली गोष्ट मिळवली. त्यानंतर केळकर यांच्या 126 व्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी संग्रहालय पुन्हा एकदा सुरू झाले. यावेळी नगारा वादन देखील करण्यात आले. केळकर यांच्या कन्या रेखा रानडे संचालक सुधनवा रानडे यांच्यासह इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.