Nigdi: पोलिसाला धक्‍काबुक्‍की केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल

Ten persons have been booked for assaulting the police in nigdi

एमपीसी न्यूज- पोलिसाला धक्‍काबुक्‍की करणाऱ्या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिंचवड स्टेशन येथील साईबाबा नगर येथे गुरुवारी (दि.28) रात्री घडली.

हरीश प्रकाश शेलार (वय 29), सतीश विजय जाधव (वय 19), विजय गौतम शेलार (वय 29), रेश्‍मा विजय जाधव (वय 40), सीता गणेश कसबे (वय 45, सर्व रा. साईबाबा नगर, चिंचवड स्टेशन) व इतर पाचजण (नाव माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी दीपक गोरोब टेंकाळे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एका व्यक्‍तीस त्रास देत असल्याबाबत त्या व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. पोलीस घटनास्थळी गेले असता आरोपींनी आपसांत संगनमत करून जमावबंदी असतानाही बेकायदा जमाव जमवून आरडा-ओरडा केला.

तसेच पोलिसांना धक्‍काबुक्‍की करत सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like