Dighi : भाडेकरूने केली मालकाच्या लॉजमध्ये चोरी; सिलेंडर, मिक्सरसह स्टीलची भांडी पळवली

एमपीसी न्यूज – पूर्वीच्या भाडेकरूने घरमालकाच्या लॉजमध्ये घुसून सिलेंडर, मिक्‍सर आणि स्टीलची भांडी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 24) पहाटे डुडुळगाव फाटा येथे  घडली.

काळुराम तुकाराम टाकळकर (वय 64, रा. दत्तनगर, डुडुळगाव) यांनी याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनिल टकले (रा. यशोदा सोसायटी, जवळकर नगर, पिंपळे गुरव) व त्याचे दोन साथीदार (नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टाकळकर यांच्याकडे अनिल टकले हा भाडेकरू होता. टाकळकर यांचे डुडुळगाव येथे मैफील नावाचा लॉज आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास आरोपी टकले हा आपल्या साथीदारांसह तिथे आला. लॉजच्या खोली क्रमांक सहाच्या काचा काढून आत प्रवेश केला. स्वयंपाक घरातील दरवाजाचे कुलूप तोडून आतील दोन गॅस सिलिंडर, मिक्‍सर आणि स्टीलची भांडी, असा 29 हजारांचा ऐवज चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.