Warje Crime News : सराईत गुंडांची दहशत, कोयत्याने वार करत तरुणावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज : वारजेतील रामनगर परिसरात सराईत गुंडांनी दहशत माजवत रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणाची दुचाकी अडवून त्याला बेदम मारहाण केली. त्याच्यावर कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रामनगर येथील हनुमान चौकात हा प्रकार घडला. वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी परशुराम तात्या गायकवाड (वय 27) यांनी फिर्याद दिली असून सराईत गुंड दादा मिसाळ, शेखर खवळे, यांच्यासह बाळ्या येनपुरे, सचिन हिरेमनी यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी हे सोमवारी दुपारच्या सुमारास मोटारसायकलवरून घरी जाताना आरोपींनी त्यांच्या दुचाकीला दुसरी दुचाकी आडवी लावून त्यांना थांबवले. त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.  त्याच्यावर कोयत्याने वार करून खून करण्याचाही प्रयत्न केला आहे.

तसेच मदतीसाठी येणाऱ्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण केली. वारजे माळवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.