Maval Corona News : नवीन 12 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह 

एमपीसीन्यूज- मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.08) 12 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 16   जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही, आतापर्यंत 523 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 120 आहे. शहरी भागात 05 तर ग्रामीण भागात 07  रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 04  रूग्ण सापडले तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत आज 01 रूग्ण सापडला. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रूग्ण सापडला नाही.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 27,464  झाली आहे. तर दिवसभरात 16   रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

शुक्रवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात  कुरवंडे येथे प्रत्येकी 02 रुग्ण सापडले.तर नाणे,भाजे,चिखलसे,इंदोरी व  जांभूळ  येथे प्रत्येकी 01 रुग्ण सापडले. असे एकूण 07 रुग्ण सापडले. 26, 821 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 523
रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,759  लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,500 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,371रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 14,630  रुग्ण तर ग्रामीण भागात 12,834 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 97.66 टक्के आहे तर  मृत्यू दर 1.90  टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 63  , लोणावळा नगरपरिषदमध्ये 09 , वडगाव नगरपंचायतमध्ये 03 व ग्रामीण भागात 45  असे एकूण 120  रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.