Maval Corona News : नवीन 40  रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह 

एमपीसीन्यूज – मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.04 ) 40  रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 03 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

काल एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 166 आहे.

शहरी भागात 28 रूग्ण तर ग्रामीण भागात 12 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 14 रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 13 रूग्ण आज सापडले.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 01 रूग्ण आज सापडला.

तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 27,967  झाली आहे. तर दिवसभरात 03 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आला. आतापर्यंत 27,276 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मंगळवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात गहुंजे येथे 07 रुग्ण सापडले.तर कुणे नामा येथे 03  रुग्ण सापडले आणि  उकसाण,  व नवलाख उंब्रे  येथे प्रत्येकी  01 रूग्ण सापडला. असे एकूण 12 रुग्ण सापडले.

तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,935 , लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,610  व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,389  रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 14,934  रुग्ण तर ग्रामीण भागात 13,033 रुग्ण आढळून आले आहेत.

# एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही.

# कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 97.53

# टक्के आहे तर मृत्यू दर 1.88 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 41, लोणावळा नगरपरिषदमध्ये 59, वडगाव नगरपंचायतमध्ये 05 व ग्रामीण भागात 61 असे एकूण 166  रुग्ण आहेत.

अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.