Technology News : टेस्ला पाठोपाठ ट्रीटॉन इव्ही भारतात !

एमपीसी न्यूज : अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने भारतात एन्ट्री केल्याच्या मागोमाग आणखी काही नव्या ऑटो कंपन्या भारतात पाउल टाकण्याच्या तयारीत असून त्यात अमेरिका आणि फ्रांस कंपन्या आघाडीवर आहेत. टेस्ला बरोबरच आणखी एक इलेक्ट्रिक कार मेकर अमेरिकन कंपनी ट्रीटॉन त्यांची कार भारतात लाँच करत आहे.

कंपनीही पहिली कार इलेक्ट्रिक सेदान एन ४ जबरदस्त लुक घेऊन येत आहेच पण तिला पॉवरफुल बॅटरीची जोड दिल्याने टी एका चार्जमध्ये ५०० ते ७०० किमी धावू शकणार आहे.

ट्रीटॉनने भारतात विस्तार योजनाही आखली आहे. त्यासाठी भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनीबरोबर बोलणी सुरु आहेत. पहिली ट्रीटॉन एन ४ इव्ही ३५ लाख या बेसिक किमतीत उपलब्ध असेल. एन ४, एन ४-५, एन ४-आर आणि लिमिटेड एडीशन एन ४ जीटी अश्या व्हेरीयंट मध्ये या कार भारतात सादर होणार आहेत. लिमिटेड एडीशनची भारतात फक्त १०० युनिट विकली जाणार आहेत.

या कार्स साठी ७५ ते १०० केडब्ल्यूएच बॅटरी असतील आणि एका चार्जमध्ये या कार्स ५२३ ते ६९३ मिमी अंतर कापू शकतील. भविष्यातील मोबिलिटी म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहिले जात असून भारतात या वर्षात अनेक इलेक्ट्रिक कार्स सादर होणार आहेत. त्यात मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स, प्रवेग यांचा समावेश असून त्यांच्या किमती १० ते २० लाखाच्या दरम्यान असतील असे समजते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.