Pimpri: ‘सीईओ’च्या नावे बनावट ई-मेल; नऊ लाखाची फसवणूक
एमपीसी न्यूज – पिंपरीतील एका नामांकित कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिका-याचे(सीईओ)नावे बनावट ई-मेल तयार करुन त्याद्वारे तब्बल नऊ लाख तीस हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार नुकताच उघडकीस आला.
याप्रकरणी कृष्णा एन. सुवर्णा (वय 62 रा. मिरा रोड ठाणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना मुंबई-पुणे महामार्गालगत या कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीचे सीईओ विनोद वाजीपुली हे मॉरेशियसमध्ये असताना 16 व 17 मे रोजी अज्ञाताने त्यांचे इमेल खाते हॅक केले. त्यांचा नावे बनावट ई-मेल आयडी तयार केला. त्याद्वारे फिर्यादी सुवर्णा यांना बनावट मेल पाठवून 16 मे रोजी 4 लाख 80 हजार 300 रुपये आणि 17 मे रोजी 4 लाख 50 हजार असे 9 लाख 30 हजार 300 रुपये फसवणूक करत ट्रॉन्सफर करुन घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पिंपरी ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक (गुन्हे)रंगनाथ उंडे तपास करत आहेत.