Vadgaon Maval : अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पुणे जिल्हा कार्यकारीणीवर ठाकर, वरघडे, निंबळे

एमपीसी न्यूज : अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या कार्य प्रणालीनुसार जुन्या कार्यकारीणीचा तीन वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आल्याने नवीन नव्वद पदाधिकाऱ्यांच्या  कार्यकारीणीचा नियुक्ती प्रदान सोहळा शांतीब्रम्ह मारुतीबाबा कुर्‍हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच डांगे पंच धर्मशाळा आळंदी येथे संपन्न झाला. 

यावेळी बोलताना बोधले महाराज यांनी ‘ गाव तेथे वारकरी मंडळाची शाखा ‘ संपुर्ण भारतभर स्थापन करून संतांचे विचार तळागाळात पोहोचवुन व्यसनाधिन तरूण सन्मार्गाला लावून सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम वारकरी मंडळाच्या वतीने केले जाईल असे सांगितले. त्याचबरोबर गुरुवर्य कुर्‍हेबाबा यांच्यासह अभय टिळक, कल्याणजी गायकवाड, शंकरमहाराज शेवाळे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी हभप सुखदेव महाराज ठाकर(जिल्हाध्यक्ष), दत्तोबा भोते (मार्गदर्शक),भरत वरघडे गुरुजी (कोषाध्यक्ष), दिनकर निंबळे(सहसचिव) संतोष कुंभार(वा.शि.स. प्रमुख), ॲड.कृष्णा दाभोळे, डाॅ.विकेश मुथा, शांताराम बोडके,विजय गाडे,आशा भोसले,भामाबाई जाधव यांची मावळ मधुन निवड करण्यात आली.तर मावळसह पुणे जिल्हयातुन नव्वद पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी निवडण्यात आली.

यावेळी राष्ट्रीय,प्रादेशिक पदाधिकाऱ्यांसह पुणे जिल्ह्यातून मोठया संख्येने वारकरी हजर होते. सामुदायीक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.