Tathwade : नवनिर्मितीतूनच भविष्यात उद्योजक घडतील – डॉ. सरदेशमुख

एमपीसी न्यूज  – “सध्याचे युग हे डिजिटल युग आहे.या  स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर आपल्याकडे असलेल्यासंशोधक वृत्तींना चालना देवून नवनिर्मितीचा ध्यास घेतला पाहिजेत .जेणेकरून या नवनिर्मितीतूनच भविष्यात उद्योजक घडतील” आणि छोटया संकल्पनेतून भव्य व्यवसायिक साम्राज्य उभे राहतील . असे प्रतिपादन मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख यांनी केले.

जेएसपीएम संचलित ताथवडे शैक्षणिक संकुल येथील शाहू कॉलेजच्या वतीने  आयोजित केलेल्या “इनोव्हिजन 2019 ” तांत्रिक महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डेक्का लीप टेक्नॉलॉजिज चे प्रमुख अनिर्बनसरकार, टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेसचे महाव्यवस्थापक शेखर कांबळे, ,जेएसपीएमचे संचालक ए के भोसले,ताथवडेशैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ पी.पी विटकर,संकुलाचे कार्यकारी संचालक प्रा सुधीर भिलारे,संकुल उप संचालकरवी सावंत, प्राचार्य डॉ.राकेश जैन,उप प्राचार्य डॉ.अविनाश देवस्थळी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी शेखर कांबळे म्हणाले कि, काळानुसार आपण बदलले पाहिजेत. अन्यथा  काळ प्रवाहात टिकू शकणारनाही. आज व्यवसायात यशस्वी होण्यासाठी ऑटोमेशन,क्लाउड कॉम्पेटिंग, डेटा ऍनेलिटीक्स आणि उत्पादनातीलसुधारणा करून सातत्याने बदल करणे (इजाइल) या चौघांची सांगड घालावी लागेल. शिवाजी महाराज यांनी तीनशेवर्षांपूर्वी याच पद्धतीचा वापर करून स्वराज्य उभे केले.

विद्यार्थ्यांना प्रोहत्सान देताना सरकार म्हणाले कि, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अहंकार व उद्धटपणा यांनाथारा देऊ नका.जिंकणे किंवा हरणे हा आयुषयाचा भाग आहे मात्र आपण विजिगिषु वृत्ती ने आपण अपयशावर मातकरू शकतो.या सामाजिक-तंत्र विषयातील स्पर्धात्मक  अभियांत्रिकीच्या तांत्रिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्येसमाजाभिमुखता निर्माण व्हावी तसेच तंत्रशिक्षणाचे उपयोजन सामाजिक समस्या निर्मुलनासाठी करण्याची क्षमता विकसित व्हावी, या दॄष्टीकोनातुन “इनोव्हीजन – 2019” या उपक्रमाचे आयोजन केले असल्याची माहितीप्राचार्य डॉ. राकेश जैन यांनी दिली.

या  इनोव्हिजनमध्ये  “मॉडेल मेकिंग “, ” ऍड मॅनिया “, “मूव्ही  मेकिंग”, .ड्रोन कडुन विविध काम करून घेणारी ड्रोन मॅनिया हि स्पर्धा विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण ठरली. , मोबाइलला ऍप डेव्हलप,  रोबोवॉर, पेपर प्रेझेन्टेशन, ऍप्टिट्यूड क्रॅकर, वेब स्ट्रुक्ट, डेटाथोन, काँट्रॅपशन्स, लेथ वॉर, सर्किट मेकिंग, फार्मा क्रॅकर, या सारख्या स्पर्धांचेआयोजन केले होते . पेटंट अँड कॉपी राइट चे महत्व सांगणाऱ्या  स्वयंम  उपक्रमात शाहू  कॉलेजच्या  विद्यार्थ्यांनी  मिळविलेल्या  पेटंट ची  माहिती प्रदर्शन, फार्मसी विद्यार्थ्यांनी अन्न पदार्थातील भेसळ ओळखणे अनेकनाविन्यपूर्ण कल्पना इनोव्हीजनमध्ये मांडले होते .

संस्थेचे संस्थापक –  सचिव तथा आमदार डॉ.तानाजी  सावंत यांचे प्रोत्साहन आणि अमुल्य मार्गदर्शन लाभतआहे . डॉ एम एम पुरी (संचालक पीजी प्रोग्रॅम), इनोव्हिजनचे संयोजक डॉ अजय पैठणे आणि  विद्यार्थी प्रतिनिधीऋतुजा जोगदंड, प्राची भोसले, जिग्नेश पाटील,अमोल सोनकांबळे हे विधार्थी विशेष प्रयत्न केले. आभार डॉ. राजाभाऊ मते यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.