Pimpri News : कंत्राटी महिला सफाई कामगारांचे थाळीनंद आंदोलन

'Thalinand' movement of contract women cleaners.

एमपीसी न्यूज – कंत्राटी पद्धतीने साफसफाईची कामे करणा-या महिला कर्मचाऱ्यांनी आज विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसमोर थाळीनंद आंदोलन केले.  कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतुत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 

याप्रसंगी बळीराम काकडे, प्रल्हाद कांबळे, मधुरा डांगे, कांताबाई कांबळे, संगीता जानराव, मंगल तायडे, सविता लोंढे, प्रमिला गजभारे, अरुणा पवार, रुक्मिणी कांबळे, जयश्री धोत्रे, आशा पठारे, उपस्थित होते.

तसेच, रिपब्लिकन युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे, अजय लोंढे, भारत मिरपगारे, भिमा कोरेगाव संघर्ष समिती अध्यक्ष अनिता साळवे यांनी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठींबा दिला.

सणासुदीच्या काळात थाळी बडविण्यास लावणे हा आपल्या प्रशासनाचा नाकर्तेपणा असून प्रशासनाच्या या लहरी कारभारामुळे सफाई कामगारांचे जगणे मुश्किल झाले आहे.

विविध मागण्यांसाठी सफाई कामगार महिलांनी आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तिव्र करण्यात येणार असल्याचे बाबा कांबळे यावेळी म्हणाले.

* या आहेत मागण्या 

– कंत्राटी पद्धतीने साफ सफाईची काम  करणा-या सर्व महिलांना कायम सेवेत घेण्यात यावे.

– कामगार कायदा नियमा नुसार दिवाळी निमित्त पगारा एवढा बोनस मिळाला पाहिजे.

– थकीत प्रा.फंड महिलांच्या नावावर मिळावा.

– घरकुल योजनेत प्राधान्य देऊन साफ सफाई कामगार महिलांना घरकुल मिळावे.

– साफ सफाई कामगार महिला काम करत असलेल्या ठिकाणी डबे ठेवण्याची, पाण्याची व जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.