Thane News : मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट, मराठी कलाकार मयुरेश कोटकर याला अटक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी कलाकार मयुरेश कोटकर याला ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. मयुरेशला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली होती.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट करण्यात आला. पालकमंत्र्याविषयी असलेला हा आक्षेपार्ह शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात कोटकर यांच्याविषयी तक्रार केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कोटकर याला तत्काळ अटक केली.

नवी मुंबईच्या विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी सध्या होत आहे. मयुरेशनेसुद्धा हीच मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. त्याने फेसबुकवर याबाबत अनेक पोस्ट्स केल्या आहेत. दरम्यान ही पोस्ट फेसबुकवरून हटवण्यात आली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.