Thane News: ‘स्वाध्याय परिवार’चे डॉ. रावसाहेब तळवलकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांचे जावई डॉ. श्रीनिवास नीळकंठ तथा रावसाहेब तळवलकर (वय 72) यांचे आज (मंगळवारी) अल्पशा आजाराने ठाणे येथेे निधन झाले. स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्री तळवलकर (दीदी) यांचे ते पती होते.

स्वाध्याय परिवाराचे काम सांभाळत असताना श्रीनिवास तळवलकर यांनी दीदींना मोलाची साथ दिली होती. स्वाध्याय परिवाराच्या कार्यातील रावसाहेबांचे योगदान मोठे होते.

श्रीनिवास तळवलकर यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण स्वाध्याय परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर ठाण्यातील तत्वज्ञान विद्यापीठात आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती स्वाध्याय परिवाराकडून देण्यात आली.

मुंबईमधील रहेजा हॉस्पिटलचे प्रमुख प्रवर्तक डॉ. नीळकंठ तळवलकर यांचे श्रीनिवास हे पुत्र होते. तळवलकर यांचे कुटुंब म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचे कुटुंब आहे. तळवलकरांच्या सलग सात पिढ्या कुठलाही खंड न पडता वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.