Thane News : ठाण्याचे पालकमंत्री मंत्री एकनाथ शिंदे बीए उत्तीर्ण

0

एमपीसीन्यूज : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्ष पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात ठाण्यातील ज्ञानपीठ विद्यालयाचा निकाल यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा 100  टक्के लागला आहे. कला शाखेतून जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे 77.25 टक्के गुणवून उत्तीर्ण झाले.

ज्ञानपीठ विद्यालय आणि ज्यूनिअर कॉलेज हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ठाण्यातील केंद्र आहे. दरवर्षी या केंद्राचा निकाल 100 टक्के लागला. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी इानपिठ विद्यालयाची निवड केली. त्यांनी अंतिम वर्षासाठी मराठी आणि राजकारण (प्रत्येकी तीन पेपर) या दोन विषयांची निवड केली होती.

विविध कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जावे लागलेल्या विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण करण्याची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ उपलब्ध करुन देते.

दरवर्षी या विद्यापीठाच्या अंतिम वर्ष पदवी परीक्षा मे महिन्यात होतात. परंतु, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आणि ऑनलाइन पद्धतीने नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आल्या होत्या.

अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची तळमळ कायम होती. त्यामुळे सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेऊन शिक्षणाचा पुन:श्च श्री गणेशा केला होता. गेली तीन वर्षे नियमित परीक्षा देऊन आता बीए पदवीधर झालो, याचे समाधान आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगीतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III