Vadgaon Maval : वरिष्ठ स्तर न्यायालयास मंजुरी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्र्याचे मानले आभार

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालयास मंजुरी दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांचा मावळ तालुक्याच्या वतीने आमदार सुनील शेळके व वकील संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

खूप वर्षाच्या मागणीनंतर वडगाव मावळ येथे दोन्ही न्यायालयांना मंजुरी मिळाल्याने  बुधवारी (दि 13) आमदार सुनील शेळके यांच्यासह वकील संघटनांनी मुंबई येथे मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार व विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांचा सत्कार केला व आभार मानले.

वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड तुकाराम काटे, अॅड सुरेंद्र दाभाडे, अॅड महेंद्र खांदवे, अॅड जयश्री शितोळे, अॅड यशवंत गोरे, अॅड प्रताप शेलार, अॅड घनश्याम दाभाडे, अॅड अविनाश पवार आदी उपस्थित होते.

वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीनेही उपमुख्यमंत्री  अजित पवार व विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष विठ्ठल पिंपळे, अॅड सोमनाथ पवळे, अॅड सुधीर भोंगाडे, अॅड मिलिंद जाधव, अॅड राकेश वहिले, अॅड सुनिल शेंडगे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.