Pune News : नाईक कुटुंबियांसमवेत ते व्हायरल फोटो पाच वर्षांपूर्वीचे : शरद पवार 

एमपीसी न्यूज : अलिबागमध्ये आत्महत्या केलेल्या अन्वय नाईक यांच्या कुटुंबासोबतचे शरद पवार यांचे फोटो सध्या सोशल मिडियात व्हायरल झाले आहेत. त्यावर पवार म्हणाले, नाईक कुटुंब मला भेटल्याचे फोटो जे व्हायरल होत आहेत, ते फोटो पाच वर्षांपूर्वीचे आहेत. राज्यपालांनी अर्णव गोस्वामीच्या काळजीपोटी फोन केला ही चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू झालाय त्यांच्याबद्दल ही थोडी सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असते, अशी खोचक टोलाही शरद पवार यांनी यावेळी लगावला.

हडपसर येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पवार म्हणाले,अमेरिकेतील निवडणूक निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केली जात असलेली वक्तव्य ही त्यांच्या वयाला शोभणारी नाहीत, असेही भाष्य त्यांनी अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर केले.

पवार कुटुंबियांनी बारामतीत एकत्रित दिवाळी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल विचारले असता  कोरोनाबात काळजी घेण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्तींनी देखील  याबद्दल आवाहन केले आहे. त्यामुळे यावेळी दिवाळीत लोकांना न भेटण्याचा निर्णय घेतलाय. बाकी काही नाही, असेही पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.