Thawade : इंदिरा महाविद्यालयात ग्रंथालय सप्ताहनिमित्त विविध उपक्रम

एमपीसी न्यूज – ताथवडे येथील इंदिरा काॅमर्स अॅंड सायन्स महाविद्यालयात ग्रंथालय सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रंथालयात विद्यार्थी वाचकांसाठी विविध ग्रंथ विषयक उपक्रम आयोजित केले होते.

या ग्रंथालय सप्ताहाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डाॅ. जनार्दन पवार यांचे हस्ते करण्यात आले. ग्रंथालय सप्ताहानिमित्त विद्यार्थ्याच्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे प्रदर्शन ग्रंथालयात ठेवण्यात आले. ग्रंथालयाविषयी विद्यार्थ्यांची चर्चासत्र आणि ग्रंथालय भेट असा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच ग्रंथपाल प्रा. शिल्पा पवार यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाविषयी बरेच काही यावर मार्गदर्शन केले.

प्रा. अमोल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील संशोधनपर नियतकालिकांचे पुनरावलोकन करुन त्यावर चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण असा कार्यक्रम झाला. कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर अॅंड दिनेश पाणीकर यांनी देशप्रेम आणि ग्रंथप्रेम यावर मार्गदर्शन केले. तसेच मुलांनी इंडियन बजेट यावर ग्रंथालयातील उपलब्ध माहिती स्त्रोत्यांमधून माहिती शोधून त्याचे विश्लेषण केले. यातील विजेत्यांना बक्षिस देण्यात आले.

ग्रंथालय सप्ताहाच्या समारोप डाॅ. सुवर्णा दिवेकर यांनी लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमाने करण्यात आला. ग्रंथालय सप्ताहाला विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश पन्धारे, प्रभारी प्राचार्य डाॅ. जनार्दन पवार, उपप्राचार्य शिवेंद्र भूषण, ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.