Pune : मुरुड येथे पॅरा सेलिंग करताना दोरी तुटल्याने कसबा पेठेतील 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

वडील गंभीर जखमी

एमपीसी न्यूज –पुण्याच्या कसबा पेठ येथील 15 वर्षीय मुलाचा मुरुड येथे पॅरा सेलिंग करताना दोरी तुटल्याने खाली पडून जागीच मृत्यू झाला. तर त्याचे वडील देखील घटनेत गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी पॅरा सेलिंग चालकाविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वेदांत गणेश पवार (वय15, कसबा पेठ, पुणे), असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर वडील गणेश पवार हे गंभीर जखमी आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टी निमित्त पवार कुटुंबीय अलिबाग येथे फिरण्यासाठी आले होते. मुरूडच्या समुद्र किना-यावर यावेळी गणेश पवार आणि वेदांत यांनी पॅरा सेलिंग करायचे ठरवले. पॅराशुट उंच झेपावल्यानंतर काही वेळातच दोर तुटले आणि दोघेही वरून खाली कोसळले.

इतक्या उंचावरून कोसळल्याने या दुर्घटनेत वेदांतचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर मुरुड येथील रुग्णलयात उपचार सुरु आहे. या दुर्घटनेने उन्हाळ्याच्या सुट्टीत आनंद लुटण्यासाठी आलेल्या पवार कुटुंबीयांवर शोककळा पसरली. मुलाच्या मृत्यूने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, पॅरा सेलिंग चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. सध्या सर्वच किना-यावर अशा प्रकारे पॅरा सेलिंगच्या सुविधा भेटतात. या चालकांकडे पॅराशुट व अन्य तांत्रिक बाबींच्या सुरक्षिततेची तपासणी केली जाते का ? प्रशासन त्यांच्यावर लक्ष ठेवते का, किंवा भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी प्रशासन कार कार्यवाही करते या बाबी पाहणे आता महत्वाचे ठरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.