Pune : प्रेमसंबंधातून 22 वर्षीय तरुणीने घेतले पेटवून

एसएससी कार्यालयातील प्रकार

एमपीसी न्यूज – प्रेमसंबंधातून बावीस वर्षाच्या तरुणीने पेटवून घेतले. ही घटना आज शुक्रवारी (दि.14) दूपारी 4 च्या सुमारास शिवाजीनगर येथील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयातील स्वच्छतागृहात घडली. या घटनेने मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. घटनास्थळी तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक दाखल झाले. संबंधीत तरुणीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्वच्छतागृहात एका तरुणीने जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधीत तरुणी चारच्या सुमारास कार्यालयात दाखल झाली होती. तीची तेथील एका लिपीकासोबत वादावादी झाली. यानंतर तीने तडक स्वच्छतागृह गाठले. तेथे अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. तीच्या किकाळ्यांनी कार्यालयातील सर्व कर्मचारी धावतच घटनास्थळी गेले. तेव्हा ती आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली होती. कर्मचाऱ्यांनी तातडीने तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. तीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती 80 टक्के पेक्षा जास्त भाजली आहे. संबंधीत तरुणीचे येथील लिपीकाशी प्रेमसंबंध होते, यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.