Pune : आद्य क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांची 228 वी जयंती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये साजरी

एमपीसी न्यूज – आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे (Pune) यांच्या 228 व्या जयंतीचा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडला. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे सर, विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार सर उपस्थित होते.

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीचे हे 228 वे वर्ष आहे. या निमित्ताने महाराष्ट्रभर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मातंग विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मातंग विकास संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष राजेश राजगे यांनी विविध मान्यवरांचा सत्कार करून जयंतीचा कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा केला.

Melodies of Asha Bhosale Quiz 4 : जिंका ‘मेलडीज ऑफ आशा भोसले’च्या दोन प्रवेशिका!

या कार्यक्रमांमध्ये अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक व अधिसभा सदस्य डॉ. विलास आढाव, प्राचार्य व अधिसभा सदस्य डॉ. देविदास वायदंडे, डेक्कन विद्यापीठाचे डॉ. सतीश नाईक, हिंदी विभागातील प्रा. डॉ. विजयकुमार रोडे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात (Pune) आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांची भूमिका मांडली. विविध मान्यवरांनी, लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याचा आणि कर्तुत्वाचा गौरव केला.

लहुजी वस्ताद साळवे हे राष्ट्रप्रेम आणि देश मुक्ती लढ्याचे खरे प्रेरणास्त्रोत आहेत. खऱ्या अर्थाने ते आपले नायक असून त्यांनी अनेक क्रांतिवीरांना घडवले आहे. त्याचबरोबर लहुजी वस्ताद साळवे यांनी फुले यांच्या शैक्षणिक कार्याला मोठे योगदान दिले असून, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला एक सपोर्ट सिस्टीम निर्माण करण्याचे कार्य केले. प्रा. विनोद सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. आणि डॉ. माणिक सोनवणे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.