BNR-HDR-TOP-Mobile

Pune : कौन्सि्ल्स् राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतर्गत २२ व्या सीआयएससीई राष्ट्रीय अ‍ॅथलेटीक्स् स्पर्धा

महाराष्ट्राचे निश मेहता, हर्षिता शेट्टी, प्रियल दोशी चमकले !!

92
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – कौन्सि्ल्स् राष्ट्रीय क्रीडा २०१८ स्पर्धांतर्गत २२ व्या सीआयएससीई राष्ट्रीय अ‍ॅथलेटीक्स् स्पर्धेत महाराष्ट्राच्या निश मेहता याने १०० मीटर धावणे यामध्ये अव्वल क्रमांक मिळवला. महाराष्ट्राच्या हर्षिता शेट्टी हिने थाळी फेक गटात व गोळा फेकमध्ये प्रियल दोशी हिने अव्वल क्रमांक मिळवला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल, बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकूण १३ राज्यांचे सुमारे ८०० मुले आणि मुली सहभागी झाले आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन टेनिसपटू नंदन बाळ, स्पर्धेचे निरिक्षक गौरव दिक्षीत, के.सी. व्हिन्सेंट (उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे संयोजक), नोरीन फर्नांडीस (महाराष्ट्र विभागाचे प्रमुख) यांच्या हस्ते झाले. यावेळी बिशप्स् स्कूल, कँपचे मुख्याध्यापक ज्योएल एडविन, विविध राज्यातील खेळाडू, प्रशिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्युनिअर मुलांच्या १०० मीटर धावणे प्रकारात निश मेहता याने ०: सेकंद वेळ नोंदवित पहिला क्रमांक मिळवला.

ज्युनिअर मुलींच्या थाळी फेकमध्ये हर्षिथा शेट्टी हिने ३३.८९ मीटर नोंदवित पहिला क्रमांक मिळवला. वरिष्ठ मुलींच्या गोळा फेक गटात महाराष्ट्राच्या प्रियल दोशी हिने पहिला क्रमांक मिळवला.

स्पर्धेचा निकालः वरिष्ठ मुले गटः १५०० मीटर धावणेः १. अंक्षित हेमबोरम्ब (झारखंड बिहार, ४: सेकंद); २. अतुल बी.ई. (तामिळनाडू-पाँडेचेरी, ४: ३. जे.सिवांन्सकर (केरळ, ४:

वरिष्ठ मुलीः गोळा फेकः १. प्रियल दोशी (महाराष्ट्र, ९.२५मी.); पुजा संकर (तामिळनाडू, पाँडेचेरी, ८.३३ मी); आद्या थम्मीआह (कर्नाटक, ८.१९ मी.);
ज्युनिअर मुलेः १५०० मीटर धावणेः राहूल यादव (४: से., युपी व युके); साहील गायकवाड (४: से., महाराष्ट्र); आर. सारवान कुमार (४: झारखंड व बिहार);
ज्युनिअर मुलेः तिहेरी उडीः हरीहरा साकेथीव्हल (तामिळनाडू व पाँडेचरी, १३.९९ मी.); अक्क्षीत माथूर (महाराष्ट्र, १२.९६ मी.); शेरवीन जोसेफ (१२.९० मी., झारखंड व बिहार);

ज्युनिअर मुलीः थाळी फेक (डिसकस थ्रो)ः हर्षिथा शेट्टी (महा., ३३.८९ मी.); आद्या लक्ष्मी राजा (२९.६४ मी., तामिळनाडू आणि पाँडेचरी); मैत्रियी परूळेकर (२७.८७ मी., महा);

ज्युनिअर मुलेः १०० मीटर धावणेः निश मेहता (महाराष्ट्र, ०: सें.); विभास्कर कुमार (०.११.३४, आंध्रप्रदेश  व तेलंगणा); आर. जॉय अलेक्स (०.११.३८, तामिळनाडू);
ज्युनिअर बॉईजः गोळा फेकः निथीन कुमार (आंध्रप्रदेश व तेलंगणा, १३.६२); सत् करण सिंग (दक्षिण भारत, १३.१८ मी.); दर्श शहा (१२.२९ मी., महाराष्ट्र).

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.