Pune : शहरातील 31 प्रमुख उद्याने कोजागिरी पौर्णिमेला रात्री 12 वाजेपर्यंत खूली

एमपीसी न्यूज – शहरात पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये एकूण १९९ उद्याने विकसित करण्यात आलेले आहे. त्यापैकी महत्वाची 31 उद्याने कोजागिरी पौर्णिमेला (13) रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे देण्यात आली आहे. 

रात्री 12 वाजेपर्यंत खुली असणारी उद्यानांची नावे खालील प्रमाणे –

पुण्यातील १) छ.शिवाजी उद्यान,बोपोडी, २) कै.विठोबा बाळाजी मुरकूट उद्यान,बाणरे, ३) श्री संत गजानन महाराज उद्यान, गोखलेनगर, ४) चित्तरंजन वाटीका उद्यान, शिवाजीनगर , ५) छ.संभाजीराजे उद्यान, शिवाजीनगर, ६) कमला नेहरू पार्क, एरंडवणा, ७) भारतरत्न पं.भिमसेन जोशी उद्यान, भुसारी कॉलनी, ८) कै.तात्यासाहेब थोरात उद्यान,कोथरूड, ९) लिम्का जॉगिंग पार्क, बंडगार्डन, १०) मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर उद्यान, वाडीया कॉलेज समोर, ११) कै.दामोदर रा.वागस्कर उद्यान, कोरेगावपार्क, १२) छत्रपती शाहू उद्यान, बी.टी.कवडे रोड, १३) हुतात्मा स्मारक उद्यान, येरवडा १४) विमाननगर जॉगर्स पार्क,विमाननगर १५) कै.भिमाजी कळमकर उद्यान,नगररोड
१६) कै.दामोदर रावजी गलांडे उद्यान, कल्याणीनगर, १७) राजे छत्रपती शिवाजी उद्यान, वडगावशेरी, १८) श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यान, घोरपडी पेठ, १९) वा.द.वर्तक उद्यान , शनिवार पेठ, २०) महाराणा प्रताप उद्यान, बाजीराव रोड, २१) सारसबाग, सदाशिव पेठ, २२) मातोश्री कै. गयाबाई भानुदास वैरागे उद्यान, मिरा सोसायटी , २३) ज्येष्ठ समाजवादी नेते ग.प्र.प्रधान उद्यान, हडपसर, २४) कै. विठ्ठलराव शिवरकर उद्यान, वानवडी, २५) डॉ.राममनोहर लोहीया उद्यान, हडपसर, २६) स्वामी विवेकानंद उद्यान, कोंढवा, २७) भगवान महावीर उद्यान, सुखसागरनगर,कात्रज, २८) कै.वसंतराव एकनाथ बागुल उद्यान (नाला पार्क), सहकारगनर, २९) कै.आमदार बाबुराव वाळवेकर उद्यान, सहकारनगर, ३०) शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यान,कर्वेनगर ३१) डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यान,पटवर्धन बाग ही सार्वजनिक उद्याने रात्री १२.०० वाजेपर्यंत खुली राहणार आहे तरी , सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.