Dehuroad : पॅरोल रजेवर असताना पाच वर्षांपासून फरार आरोपीला अटक

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी; नाशिक कारागृहातून खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता

एमपीसी न्यूज – नाशिक कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी पॅरोल रजेवर तुरुंगातून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर कैदी तुरुंगात परतलाच नाही. पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणा-या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली.

मल्हारी काशीनाथ जाधव (वय 58, रा. नढे नगर, पिंपरी, पुणे) असे अटक केलेल्या फरार आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस देहूरोड परिसरात शुक्रवारी (दि. 7) गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी सावन राठोड आणि गणेश मालुसरे यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती देहूरोड येथे येणार आहे. तो नाशिक कारागृहातून पॅरोल रजेवर आला असून पाच वर्षांपासून तो अद्याप कारागृहात परतलेला नाही. त्यानुसार पोलिसांनी देहूरोड परिसरात सापळा रचून मल्हारी याला ताब्यात घेतले.

मल्हारी याने 1992 साली खून केलेला आहे. त्याबाबत मुलूंड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून त्याची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शिक्षा भोगत असताना 2015 मध्ये तो पॅरोल रजेवर तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर तो पळून जाऊन फरार झाला. त्याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या मल्हारीला युनिट पाचच्या पोलिसांनी अटक करून मुलुंड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटिल, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी सावन राठोड, गणेश मालुसरे, मयुर वाडकर, फारुक मुल्ला, संदीप ठाकरे, दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, दयानंद खेडकर, राजकुमार इघारे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, भरत माने, श्यामसुदर गुट्टे, गोपाळ ब्रम्हांदे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.