Chakan : काचा फोडणा-या आरोपीला गावक-यांनी टाकले बांधून

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाणा-या वाहनांना अडवून त्यांच्या काचा फोडणा-या आरोपीला गावक-यांनी मिळून लोखंडी खांबाला बांधून टाकले. ही घटना गुरुवारी (दि. 18) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास खेड तालुक्यातील भांबोली गावात घडली.

चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय धोंडीराम नीलपत्रेवार यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जितू गायकवाड, साहिल गायकवाड, शेखर महेश नाईकनवरे, साहिल दिलीप नाईकनवरे, पिंट्या पानमंद, उत्तम पानमंद, मयूर बुट्टे, भाऊ (पूर्ण नाव माहिती नाही) आणि अन्य 10 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांबोली गावात एमएसईबी कार्यालयासमोर मारुती राघोजी बळे (वय 32, रा. माळी वेताळ महात्मा फुले चौक, मालेगाव, जि. नाशिक) हा गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रस्त्याने जाणा-या वाहनांना थांबवून त्यांच्या काचा फोडत होता. यासाठी गावातील नागरिकांनी त्याला विरोध केला. यावरून मारुती आणि गावकरी यांच्यामध्ये भांडण झाले. गावक-यांनी मारुती याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर मारुतीला लोखंडी खांबाला बांधून टाकले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.