23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Crime News : कोयता घेऊन आरोपीच धावला पोलिसांच्या अंगावर

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावरच सराईत आरोपी कोयता घेऊन धावला असल्याची घटना शुक्रवारी (दि.29) दुपारी वैद वस्ती, पिंपळे गुरव येथे घडली.

मनोज गांधी लोखंडे (वय 20, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अनिल देवकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगवी पोलीस शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता त्याच्या घरी गेले. त्याला पोलिसांसोबत सांगवी पोलीस ठाण्यात येण्याबाबत कळवले असता त्याने घरातून कोयता आणला आणि कोयता घेऊन पोलिसांच्या अंगावर धावून आला. तुम्ही मला पोलीस स्टेशनला घेऊन जाल तर याद राखा, अशी धमकी देत त्याने सरकारी कामात अडथळा निर्माण केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

spot_img
Latest news
Related news