The Action Hero’ movie : ‘द अॅक्शन हीरो’ चित्रपट ….एका प्रतिमेचा अजब खेळ 

एमपीसी न्यूज-  कधी कधी कुठल्याही क्षेत्रात विशेषत: सिने नाट्य क्षेत्रामध्ये आपल्याला खूप कष्टाने प्रसिद्धी मिळाली, तर ती प्रसिद्धी टिकवणे हे जसे आव्हान असते,  तसेच निर्माण झालेली (The Action Hero’ movie) प्रतिमा टिकवणे हे सुद्धा खूप मोठे आव्हान असते. भलेभले या आव्हानात वाहून जातात आणि काही जण बुडून ही जातात.
या चित्रपटात एक हीरो,जो यशाच्या अतिउच्च शिखरावर विराजमान आहे. हा जो सूपरस्टार मानव आहे, हा अॅक्शन हीरो च्या प्रतिमेत इतका बुडून गेला आहे. की, वास्तवात सुद्धा ही प्रतिमा जपण्याच्या नादात तो संकटांमध्ये अधिकच अडकत जातो आणि मग सुरू होतो जीवघेणा खेळ.
हातून नकळत घडलेला एक गुन्हा, एक हत्या त्यातून निर्माण झालेले सूडनाट्य. त्यातून हा मानव गुन्हेगारीच्या परमोत्च्च टोकाकडे खेचला जातो. त्यातून बाहेर पडण्याच्या धडपडीत त्याच्याकडून गुन्ह्यांची एक न संपणारी मालिकाच होत जाते. पाहाताना हे सगळे गंभीर ही वाटते. तितकेच हास्यास्पद ही आहे सगळेच.
एक क्षण हसावे का रडावे हे ही कळेनासे होते. म्हणजे पाहताना “ अरे कशाला? अरे हा परत अडकला” असे म्हणेपर्यंत पुन्हा सुटकेचा निश्वास, मग पुन्हा नवे संकट. त्यात तो भुरा नावाचा आधीचा पहिलवान आणि आत्ताचा राजकीय नेता असलेला, ज्याच्या भावाचा जीव नकळत पणे मानव कडून गेला. तो सूडाने (The Action Hero’ movie) पेटून मानव चा जीव घ्यायला त्याच्या मागे मागे फिरतोय. त्याला काहीही करून मानव चा जीव घ्यायचाय. त्याला बाकी काहीही दिसत नाही. तो मानव च्या मागेच असल्याने भुरा ही प्रत्येक च संकटामध्ये मानव इतकाच उगाचच अडकतो. त्याला फक्त मानव ची हत्या करायची असल्याने त्याला जाणीव च नाहीये की, आपण कसे अडकत चाललोय?
सरते शेवटी त्याच्याच जीव घ्यायच्या हट्टापायी इथे सगळा वाचण्याचा खेळ असल्याने, मानव कडून भुराचीच हत्या होते. आणि त्याची कुठलीच शिक्षा मानव ला होत च नाही. कारण परिस्थिति इतकी काही बदलली जाते. प्रतिमेचे खेळ इतके रंग बदलते, लोकांच्या, माध्यमांच्या, पोलिसांच्या नजरेत व्हिलन असलेला मानव अचानक हीरो होतो आणि जे जे त्याच्या विरुद्ध गेलेले असते, ते सगळेच त्याच्या शेवटच्या कृतीच्या बाजूने उभे राहते.  आपल्याला “ हे असे होणे शक्यच नाही” असे वाटते.
सिनेमाच्या बाबतीत असे वाटणे हे थोडेसे या सिनेमाचे अपयश आहे. कारण बाकी खेळ बघत असताना सिनेमा भर आपल्याला मानव ला शेवटी तरी शिक्षा होणारच असे वाटते. पण  “आखिर मे एक्शन हीरो सब कुछ ठीक ही कर देता है!” हे सिनेमाचे घोषवाक्य असल्यानेच अडखळत शेवट केल्याचे जाणवते.
विशेषत: मोठ्या पोलिस अधिकाऱ्यांना गंडवून, मानव आपल्याला हवे तसे सोडवून घेतो आणि हीरो होतो हे काही आपल्याला पटत नाही. थोडेसे वेगळ्या मार्गाने त्याला हीरो होता आलेच असते. त्याचा सिनेमातला मार्ग काही पटत नाही.
आयुष्यमान खुराना याने मानव ची भूमिका अगदी अफलातून केली आहे.

त्याचा अभिनय खरच कौतुकास्पद आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य हे आहे की, या सिनेमात उगाचच हिरोईन घेतलेली नाही. नाही म्हणायला मलाइका अरोरा चे एक नृत्य आहे. पण ते पण प्रसंगानुरूप आहे. सगळ्यात शेवटी नुरा फतेई चा ही एक डान्स आहे. पण तो ही सिनेमाचाच भाग आहे.
बाकी भूमिका सगळ्यांच्याच उत्तम आहेत विशेषत: जयदीप अहलावत याने भुरा च्या भूमिकेत मजा केली आहे. राजकीय नेता असलेला पण मूळचा पहिलवान त्याने फारच उत्तम साकारला आहे. तसेच हर्ष छाया ने रोशन ची म्हणजेच मानव च्या असिस्टंट ची भूमिका उत्तम केली आहे.
विशेष उल्लेख नामवंत दिग्दर्शक आणि अभिनेता गौतम जोगळेकर यांची एक अफलातून भूमिका या चित्रपटात आहे. त्यांचे भूमिकेतील नाव आणि एकंदर वावर हा एका वास्तवातील एका (The Action Hero’ movie) अंडर वर्ल्ड मधील नामचीन गुंडाशी तंतोतंत साधर्म्य असलेली भूमिका गौतम जोगळेकर यांनी फारच मस्त सादर केली आहे. तिथे मात्र अस खरच घडायला हवे असे वाटते.
हा सिनेमा नीरज यादव यांनी लिहिला आहे, तर दिग्दर्शन अनिरुद्ध अय्यर यांनी केले आहे. तर चित्रण कौशल शाह यांनी केले आहे. तर निनाद खानोलकर यांनी संकलन केले आहे. संगीत पराग छाब्रा आणि सनी एम आर यांनी दिले आहे. तर टी सिरिज आणि कलर यल्लो पिक्चर्स ने याची निर्मिती केली आहे.
एकूण आयुष्मान खुरानाला एका नेहमीपेक्षा हटके भूमिकेत पाहायचे असेल तर हा सिनेमा,  तुमच्यासाठी  नक्कीच एक पर्वणी ठरेल यात शंका नाही. नेटफ्लिक्स या ओटीटी वर हा सिनेमा आपल्यासाठी (The Action Hero’ movie) उपलब्ध आहे .
 धन्यवाद .
   
लेखक : हर्षल आल्पे 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.