Pune: क्वारंटाईन सेंटरसाठी येरवड्यातील वसतिगृह ताब्यात, 300 बेड्सची सोय

The administration took possession of the hostel in yerwada for quarantine purpose in pune amid coronavirus outbreak

एमपीसी न्यूज- येरवडा परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने वसतिगृह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे 300 बेड्सची क्षमता असलेले ऍटच बाथरूम असे सुसज्ज कोरोना सेंटर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नगरसेवक संजय भोसले यांनी दिली.

येरवडा परिसरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्या प्रमाणात कोरोना सेंटरसाठी जागा कमी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह ताब्यात घेण्यात आले आहे.

या ठिकाणी लवकरच कोरोना सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्याची पाहणी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त विजय लांडगे, उप अभियंता सुनील पवार, आरोग्य निरीक्षक अनिल ढमाले, प्रभाग प्रमुख भाऊसाहेब कापडी, प्रशांत मोरे, चंद्रकांत साठे, अक्षय चव्हाण, प्रमोद जाधव, आशिष साठे यावेळी उपस्थित होते.

या कोरोना सेंटरमुळे येरवडा आणि आजूबाजूच्या नागरिकांना इतरत्र बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. येरवड्यात कोरोना रुग्णांची संख्या 400 च्या पुढे गेली आहे. त्यामध्ये ऍक्टिव्ह रूग्णसंख्या 225च्या पुढे आहे. तर 22 जणांचा यामुळे बळी गेला आहे.

या भागात झोपडपट्ट्या जास्त असल्याने कोरोना बाधितांचे प्रमाण वाढतच आहे. महापालिका प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. या भागातील नागरिकांना बाहेर निघण्यास अटकाव करण्यात आला असून, महापालिकेतर्फे घरपोच अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.