Bhagatsingh Koshyari: महाराष्ट्रातून कोश्यारी हद्दपार होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहीले पाहिजे :-अशोक खांडेभराड

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षांसह सर्वसामान्य लोकांकडूनही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जातोय.आळंदी येथे दि.4 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका समोर राज्यपाल कोश्यारी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याचा शिवसेनेच्या वतीने (ठाकरे गट) तीव्र जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी शिवसेना खेड तालुका संपर्क प्रमुख अशोक खांडेभराड यांनी हे वक्तव्य केले.

Pune News: सोशल मीडियामुळे आपल्या दैनंदिन जीवनात व्यत्यय – डॉ.काळकर

राज्यपाल राज्यातील शासकीय व्यवस्थेतला प्रमुख आहे.असा माणूस महाराष्ट्रात दिला तर महाराष्ट्राचे नुकसान करण्यासाठी ,महाराष्ट्रात कलह निर्माण करण्यासाठी, भाजपा ची योजना आहे.ही योजना हाणून पाडण्यासाठी पुन्हा आंदोलन करत आहोत.जोपर्यंत कोश्यारी महाराष्टातून जात नाही तो पर्यंत शिवसेना जागोजागी आंदोलन करणार.महाराष्ट्रातून कोश्यारी हद्दपार होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील पाहिजे.

तसेच यावेळी शिवसेना नेते उत्तम गोगावले,आनंदराव मुंगसे, अविनाश तापकीर यांनी कोश्यारी यांच्या व्यक्तवाबद्दल निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेना पदाधिकारी रमेश गोगावले, शैलाताई तापकीर, विभाग प्रमुख संदीप पगडे, तुषार नहार ,उपशहर प्रमुख शशिराजे जाधव, मंगेश तिताडे ,संपर्क प्रमुख बालाजी शिंदे , महिला आघाडीच्या अनिताताई झुझम, उषाताई ननवरे ,अनिता शिंदे ,शुभंगी यादव ,संतोषी पांडे, भारती वाघमारे , विजया विसपुरे,शारदा लांडे,संगीता फफाळ,युवासेना उपशहर प्रमुख निखिल तापकीर , आशिष गोगावले व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.याबाबत ची माहिती चारुदत्त रंधवे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.