Pimpri News: माफ झालेल्या शास्तीची रक्कम पुढील बिलात समायोजित होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार चौरस फुट आकाराच्या अनधिकृत निवासी बांधकामांवरील शास्तीकर 100 टक्के माफ केला आहे. तर, 1 हजार 1 ते 2 हजार फुट आकाराच्या शास्तीकर 50 टक्के माफ करण्यात आला आहे. त्यातील ज्यांनी शास्तीकर भरला आहे. त्यांच्या पुढील बिलात ती रक्कम समायोजित केली जाणार आहे.

राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील 500 चौरस फुट अनधिकृत निवासी घरांना 100 टक्के शास्तीकर माफी दिली आहे. त्यानंतर 501 ते 1 हजार चौरस फुटांच्या अनधिकृत घरांचा ही 100 टक्के शास्तीकर माफ झाला. तर, 1 हजार 1 ते 2 हजार चौरस फुटांच्या अनधिकृत घरांना 50 टक्के शास्तीकर माफ करण्यात आला आहे. यातील काही मालमत्ता धारकांनी शास्ती कर भरला होता. त्यांची रक्कम त्यांच्या बिलात समाविष्ट केली जाणार आहे. रक्कम कधी समायोजित होणार आहे. याबाबत नागरिकांकडून विचारणा केली जात होती.

_MPC_DIR_MPU_II

1 हजार चौरस फुट अनधिकृत घरांचा शास्तीकर 54 हजार नागरिकांनी भरला आहे. तर, 1 हजार 1 ते 2 हजार चौरस फुट अनधिकृत घर असलेल्या 15 हजार जणांनी शास्तीकरासह बिल जमा केले आहे. शास्तीकराची रक्कम पुढील बिलात समायोजित केली जाणार आहे. त्याची कार्यवाही या महिन्यांच्या अखेरीस संपेल. त्यानुसार नव्याने बिले दिली जाणार आहेत, असे कर संकलन विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.