Pune Crime News : वडिलांनी दुसरे लग्न केल्याचा राग, सावत्र आईचा खून करून मुलगा पसार

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील भोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांनी दुसरे लग्न केल्याच्या रागातून सावत्र मुलाने डोक्यात दगड घालून सावत्र आईची हत्या केली. हत्या केल्यानंतर मुलगा पसार झाला आहे. भोर परिसरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. भोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. शिवम (वय 22) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शिवमच्या आईचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. वडिलांचे दुसरे लग्न मान्य नसल्याने त्याच्या मनात याबद्दल राग होता. कामानिमित्त तो कात्रज परिसरात राहत होता. दरम्यान घटनेच्या दिवशी शिवमचे वडील रात्रपाळी निमित्त कामावर गेले होते. हीच संधी साधून तो भोर येथील आपल्या घरी गेला आणि पहाटे सर्वजण गाढ झोपेत असतानाच शिवमणी सावत्र आईचा गळा चिरला. त्यानंतर डोक्यात दगडी पाटा घालून त्याने सावत्र आईची निर्घृण हत्या केली.

Maharashtra Political Crisis : मी पुन्हा येणार…! सत्तास्थापनेसाठी भाजप सज्ज, देवेंद्र फडणवीस बनणार मुख्यमंत्री

खून केल्यानंतर शिवम त्या ठिकाणाहून पसार झाला. दरम्यान मयत महिलेच्या दोन मुलींनी हा सर्व प्रकार पाहिला आणि त्यांनी आरडाओरडा केला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या प्रकरणी गुन्हा दाखल केला. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.