Talegaon News : बनावट चावी आणि गोपनीय कोड टाकून अवघ्या चार मिनिटात एटीएम फोडले; साडेसात लाख रुपये लंपास

एमपीसी न्यूज – बनावट चावी आणि गोपनीय कोड टाकून एटीएम उघडले. एटीएम मधून 7 लाख 52 हजार 300 रुपये अनोळखी तीन चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना तळेगाव दाभाडे येथील अभ्युदय बँकेच्या समोर बँकेच्या एटीएममध्ये घडली. हा प्रकार अवघ्या चार मिनिटात घडला.

बँकेचे मॅनेजर राजू प्रभाकर कांबळे (वय 50, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत रविवारी (दि. 25) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी दि. 23 रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. तळेगाव दाभाडे येथे असलेल्या अभ्युदय बँकेच्या बाहेरील बाजू अभ्युदय बँकेचे एटीएम आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजून सहा मिनिटांनी तीन अनोळखी चोरट्यांनी एटीएम मध्ये प्रवेश केला. बनावट चावीचा वापर करून चोरट्यांनी एटीएम उघडले. गोपनीय कोड टाकून एटीएम मधून 7 लाख 52 हजार 300 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.  अवघ्या चार मिनिटात चोरट्यांनी एटीएम फोडून रोकड चोरली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.