Pune:’ऑरा’ 2018 प्रदर्शनातून घडणार तिबेटियन संस्कृतीचे दर्शन

एमपीसी न्यूज – सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनतर्फे ‘ऑरा’ 2018 या जागतिक दर्जाच्या अंतर्गत सजावटीचे प्रदर्शन आयोजिले आहे. यंदा या प्रदर्शनाची संकल्पना तिबेटियन संस्कृती आहे.

टिळक रस्त्यावरील अभिनव महाविद्यालया शेजारी असलेल्या संस्थेच्या परिसरात हे प्रदर्शन 28, 29 व 30 डिसेंबर 2018 या तीन दिवशी भरणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 28)सकाळी साडेनऊ  वाजता होणार असून, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे सचिव विजय कोल्हे, परांजपे बिल्डर्सचे शशांक परांजपे, इन्स्टिटयूट ऑफ इंडियन इंटिरिअर डिझाईनचे अध्यक्ष अश्विन लोवेकर, रचनाकार महेश नामपूरकर उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.