chakan : १८ हजार क्विंटल कांद्याची आवक सरासरी भाव २५ रुपये किलो

एमपीसी न्यूज –  खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डात कांद्याच्या आवकेत वाढ सुरू झाली असून, शनिवारी (दि.१)  तब्बल १८ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला प्रतवारीनुसार २ हजार ते ३ हजार रुपयांचा भाव मिळाला असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले. कांद्याला सरासरी दर प्रतिकिलो २० ते २५ रुपये मिळाल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.  

चाकण मार्केटमध्ये शनिवारी कांद्याची आवक वाढल्याने सरासरी दरात मोठी घसरण होण्याची भीती होती. मात्र कांद्याला २५ रुपये किलोपर्यंत सरासरी भाव मिळाला असून पुणे जिल्ह्यातील आणि राज्यातील इतर समित्यांच्या तुलनेत दर चढाच राहिला असल्याचे व्यापारी आणि शेतक-यांनी सांगितले. चाकणमध्ये शनिवारी १८ हजार क्विंटल कांद्याची आव होऊन पहिल्या प्रतीच्या कांद्याला ३ हजार दुसऱ्या प्रतीच्या कांद्याला २ हजार ५०० तर तिसऱ्या प्रतीच्या कांद्याला २ हजार रुपये भाव मिळाला. पुढील काळात कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी कांद्यावरील निर्यातबंदी हटवण्याची मागणी शेतकरी आणि व्यापा-यांकडून होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.