Maval : बंद पडलेल्या व्यवसायांना बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांमुळे उभारी

एमपीसी न्यूज – टायगर पॉईंट भागातील उपजीविकेचे साधन असलेल्या कुटी व टप्री चालकांचा व्यवसाय गेल्या दोन महिन्यांपासून  काही प्रसंग घडल्यामुळे सर्व व्यवसाय बंद करण्यात आले होते. पण कामगार, पर्यावरण, मदत पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन मंत्री बाळा भेगडे यांच्या सहकार्याने बंद पडलेले व्यवसाय पुन्हा सुरु करण्यात यश मिळाले. सर्व व्यवसायकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.

वनविभागाचे अधिकारी, आतवन, कुरवंडे व्यावसायिक व ग्रामस्थांच्या उपस्थित बंद केलेला बाग व्यवसायाकरिता राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा सुरू करून देण्यात आला. यावेळी बाळा भेगडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, वनविभाग अधिकारी मारणे, संचालक पांडुरंग ठाकर, गणेश धानिवले, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ गुंड, बाळासाहेब जाधव, आतवन सरपंच सखाराम कडू, वसंत म्हसकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.