Nigdi Crime News: पोलीस असल्याची बतावणी करून पळवल्या महिलेच्या 86 हजारांच्या बांगड्या

एमपीसी न्यूज – ‘आम्ही पोलीस आहोत, पुढे चोर आहेत. तुमच्या सोन्याच्या बांगड्या पर्समध्ये ठेवा’ असे सांगून तिघांनी एका महिलेच्या 86 हजार 455 रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या पळवून नेल्या. हा प्रकार मंगळवारी (दि. 9) सकाळी पावणे अकरा वाजता निगडी येथे घडला.

महिलेच्या फिर्यादीनुसार तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास निगडी येथील पवळे उड्डाणपुलापासून लोकमान्य हॉस्पिटलच्या दिशेने पायी चालत जात होत्या. त्यावेळी तोंडाला मास्क लावलेले तिघेजण फिर्यादी यांच्याजवळ आले. ‘पुढे चोर आहेत. आम्ही पोलीस आहोत. तुमची सोन्याच्या बांगड्या हातामध्ये घालून जाऊ नका’ असे आरोपींनी महिलेला सांगितले.

तसेच एकाने त्याच्या गळ्यातील सोन्याचे साखळी काढून फिर्यादी महिलेसमोर खिशात ठेवली. यामुळे महिलेचा विश्वास पटला. महिलेला हातातील बांगड्या काढण्यास लावून त्या पर्समध्ये ठेवण्याच्या बहाण्याने घेऊन बांगड्या पर्समध्ये न ठेवता 86 हजार 455 रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी फसवणूक करून नेल्या. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.