Pune News : लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यावर बँक मॅनेजरचा डल्ला

एमपीसी न्यूज : ग्राहकाने बँकेत तारण म्हणून ठेवलेले 770 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि आठ लाखांची रोख रक्कम चोरणाऱ्या असिस्टंट मॅनेजरला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याचा आपटे रस्त्यावरील एका खासगी बँकेत हा प्रकार घडला. बँकेच्या असिस्टट मॅनेजर असणाऱ्या तरुणीने व तिच्या दाजीनेच ही चोरी केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 770 ग्रॅम दागिने व 8 लाखांची रोकड जप्त केली आहे.

किरण धोत्रे (वय 24) व दीपक ढवळे (वय 25) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत एचडीएफसी बँकेचे तारण विभागातील व्यवस्थापक अतुल घावरे (वय 44) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की आपले रस्त्यावर एचडीएफसी बँकेत आरोपी तरुणी ही असिस्टंट मॅनेजर होती. यावेळी एका ग्राहकाने सोने तारण ठेवून बँकेकडूनकर्ज घेतले होते. ग्राहकाने बँकेकडे ४० लाख ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तारण ठेवले होते. हे दागिने लॉकर मध्ये ठेवण्यात आले होते आणि या लॉकरची जबाबदारी आरोपी तरुणीवर होती.  त्यानंतर या तरुणीने ८ जानेवारीला लॉकरमधून दागिने चोरले. दरम्यान, लॉकरमधील दागिने चोरीला गेल्याचे सीसीटीव्हीत हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

यानंतर डेक्कन पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत तरुणीला पकडले. चौकशी केली. यावेळी तिने दागिने दाजी दीपक याच्याकडे दिले असल्याचे समजले. काही दागिने त्यांनी मोडले होते. पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडून 770 ग्रॅम व 8 लाख रुपये जप्त केले आहेत. आता उर्वरित दागिन्यांचा शोध घेत आहेत.  वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शिल्पा लंबे व उपनिरीक्षक शिंदे यांनी हा प्रकार उघडकीस आला आहे. तपास लंबे या करत आहेत. याप्रकरणात दोघांना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सूनवलीय आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.