Sunil Gavaskar: सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणजे कपिल देव- सुनील गावस्कर

आतापर्यंत भारताने जगाला अनेक महान क्रिकेटपटू दिले. बहुतांश क्रिकेटपटूंनी दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट समृद्ध केलं. त्यात माझ्यामते सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणजे कपिल देव.

एमपीसी न्यूज – आतापर्यंत भारताने जगाला अनेक महान क्रिकेटपटू दिले. बहुतांश क्रिकेटपटूंनी दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट समृद्ध केलं. त्यात माझ्यामते सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणजे कपिल देव असे मत भारताचे लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

सुनील गावस्कर पुढे असे म्हणाले की, आतापर्यंत भारताने जगाला अनेक महान क्रिकेटपटू दिले. बहुतांश क्रिकेटपटूंनी दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट समृद्ध केलं. त्यात माझ्यामते सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणजे कपिल देव. माझ्या मते सर्व खेळाडूंपेक्षांमध्ये तो सरस आहे. सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत तो कायम पहिल्या क्रमांकावरच असेल.

तो असा खेळाडू आहे जो तुम्हाला बॅटने सामना जिंकवून देऊ शकतो आणि गरज पडल्यास गोलंदाजीनेही विजय मिळवून देऊ शकतो. तो प्रतिस्पर्धी संघाचे बळी सहज बाद करू शकतो आणि विजयश्री खेचून आणू शकतो. तसेच तो दणकेबाज शतकही ठोकू शकतो आणि झटपट 80 ते 90 धावाही करू शकतो.

त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली. त्याने टिपलेले झेलदेखील अप्रतिम होते. तो एक परिपूर्ण खेळाडू होता, म्हणूनच तो माझ्यासाठी सर्वोत्तम खेळाडू असल्याचे मत सुनील गावस्कर यांनी मांडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.