Pimpri News : घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने पेटवली

एमपीसी न्यूज – रात्रीच्या वेळी घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली. यामध्ये दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना रविवारी रात्री आठ ते सोमवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास बौद्धनगर, पिंपरी येथे घडली.

तुषार अभिमन्यू सोनवणे (वय 33, रा. बौद्धनगर, पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनवणे यांनी त्यांचे दुचाकी (एम एच 14 / ई टी 5543) रविवारी रात्री घरासमोर पार्क केली. रात्रीच्या वेळी एका अनोळखी व्यक्तीने त्यांची दुचाकी पेटवून दिली. यामध्ये दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा प्रकार सोमवारी पहाटे साडेतीन वाजता उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.