Chikhali News : सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – ताम्हाणेवस्ती, चिखली येथील हनुमान हाउसिंग सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 11) रात्री साडेदहा ते शनिवारी (दि. 12) सकाळी साडेसात या कालावधीत घडला.

विनायक सुरेश पाटील (वय 27, रा. हनुमान हाउसिंग सोसायटी, ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / जे जे 8018) शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लाॅक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.