BNR-HDR-TOP-Mobile

Alandi : रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला दुचाकी पार्क केली. दुचाकीस्वार कामानिमित्त जवळच असलेल्या कार्यालयात गेला. काम आटोपून अर्ध्यातासात परत आलेल्या दुचाकीस्वाराची दुचाकी चोरट्यांनी पळवली. ही घटना रविवारी (दि. 18) आळंदी येथे घडली.

अमोल वसंत त्रिफळा (वय 32 रा. मुकाई चौक) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी अमोल कामानिमित्त आळंदी येथे गेले. रात्री साडेसातच्या सुमारास त्यांनी आळंदी येथील एका रस्त्याच्या बाजूला दुचाकी (एम एच 12 / जे डब्ल्यू 5967) पार्क केली. दुचाकीपासून जवळच असलेल्या एका कार्यालयात ते कामानिमित्त गेले. काम उरकून अर्ध्यातासात परत आलेल्या अमोल यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3