BNR-HDR-TOP-Mobile

Moshi : पूर्ववैमनस्यातून डोक्यात दगड घालून तरुणाचा खून

0
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – किरकोळ भांडणातून तरुणाला दगडाने मारले. यात तरुण गंभीर जखमी झाला. उपचार न घेता तो रात्री झोपला. बुधवारी दुपारी डोक्यात जास्त दुखायला लागल्याने रुग्णालयात नेले असता रुग्णालयात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 12) रात्री आदर्शनगर मोशी येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मुसाफिर जकीउद्दीन काझी (वय 28, रा. आदर्शनगर मोशी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. संदीप अशोक गौड (वय 28, रा. आदर्शनगर, मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत काझी आणि त्याच्या तोंड ओळखीचा संदीप यांच्यामध्ये दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यावेळी काझी याने मित्र सचिन भोसले आणि भोला यांच्या मदतीने संदीपला हाताने मारहाण केली. याचा राग मनात धरून संदीपने मंगळवारी (दि. 11) रात्री काझीवर दगडफेक केली. यातील एक दगड काझीच्या डोक्याला लागला.

मात्र, काझी उपचार न घेता तसाच घरी जाऊन झोपला. बुधवारी दुपारी अचानक जास्त त्रास होऊ लागल्याने त्याला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालय दाखल केले. काझीवर उपचार सुरु असताना दुपारी अडीचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी संदीपला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.