Paud : चारचाकी गाडीत जळालेल्या अवस्थेत आढळले दोघांचे मृतदेह

एमपीसी न्यूज – पौडमधील पिंपरी गावाच्या हद्दीत एका चारचाकी गाडीत जळालेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळले आहेत. मयत तरुण 25 ते 30 वयोगटातील आहेत.

सिंधुदुर्गातील बांदा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दोघे फिरण्यासाठी आले होते. पिंपरी गावातील दरीत ही गाडी आढळली आहे. दोन्ही मृतदेह ओळखण्यापलीकडचे झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.