Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणामध्ये बुडालेल्या मच्छीमाराचा मृतदेह अखेर सापडला

एमपीसी न्यूज : काल संध्याकाळी भामा आसखेड धरणामध्ये (Bhama Askhed Dam) बुडालेल्या शिवे गावातील मच्छीमाराचा मृतदेह आज दुपारी बाहेर काढण्यात आला. मृत मच्छीमाराचे नाव विठ्ठल मुकणे असून त्यांचे वय 55 वर्षे होते.

शिवेगाव हे चाकणपासून अंदाजे 25 ते 27 किलोमीटर दूर आहे. हे गाव भामा आसखेड धरणाच्या किनाऱ्यावर आहे. चाकण पोलिसांनी सांगितले, की काल रविवारी 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास मुकणे त्यांच्या रबर ट्यूबच्या बोटीत बसून धरणामध्ये जाळे टाकण्यासाठी गेले होते. जाळे टाकत असताना त्यांच्या जवळील रबरी ट्यूब निसटली. ती पकडण्यासाठी मुकणे हे पोहत त्याच्यामागे गेले, पण पाण्याच्या प्रवाहामुळे व वेगवान वाऱ्यामुळे ती ट्यूब पुढेच जात होती. बराच वेळ ट्यूब न मिळाल्याने शेवटी ते मागे फिरले. किनाऱ्याकडे येण्यासाठी पोहत असताना त्यांची दमछाक झाली व ते पाण्यात बुडाले. स्थानिक तरुणांनी त्यांचा संध्याकाळी पाण्यात शोध घेतला, पण मुकणे यांचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या टीमला पाचरण केले.

Kailas Golande : सामाजिक कार्यकर्ते कैलास गोलांडे यांचे निधन

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांनी माहिती दिली, की त्यांची टीम सकाळ दरम्यान गावात पोहोचली. टीमचे सदस्य धरणाच्या पाण्यात उतरले व व त्यांनी मृतदेहाची शोधाशोध केली. किनाऱ्यापासून अंदाजे 30 ते 40 मीटर अंतरावर त्यांना मुकणे यांचा (Bhama Askhed Dam) मृतदेह सापडला. तेथे पाणी 10 ते 15 फूट खोल होते. त्यांनी तो मृतदेह किनाऱ्यावर अंदाजे दुपारी 12 ते 12.30 वाजेच्या दरम्यान आणला.

अध्यक्ष गणेश निसाळ, आपत्ती व्यवस्थापन सर्च अँड रेस्क्यू टीम, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, विनय सावंत, निनाद काकडे, सत्यम सावंत, अवी कारले, विकी दौंडकर, साहिल नायर व साहिल लांडगे हे आजच्या रेस्कयू टीममध्ये होते. यावेळेस सरपंच ज्ञानेश्वर शिवेकर, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साळुंखे व चाकण पोलीस स्टेशनच्या पाईट चौकीचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या संदर्भात चाकण पोलीस ठाण्यात मुकणे यांची आकस्मात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.