Chinchwad : पवना नदीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

एमपीसी न्यूज – पवना नदीत मोरया गोसावी मंदिराजवळ जिजाऊ बगीचा समोर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. अग्निशमन विभागाने मृतदेह नदीतून बाहेर काढला.

गुरुवारी (दि. 19) दुपारी सव्वापाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षातून अग्निशमन विभागाला माहिती मिळाली की, मोरया गोसावी मंदिराजवळ जिजाऊ बगीचासमोर पवना नदीत एक मृतदेह आढळला आहे. त्यानुसार सब-ऑफिसर शांताराम काटे, फायरमन शंकर पाटील, अशोक कदम, अमोल चिपळूणकर, विलास कडू, शिवलाल झणकार, लक्ष्मण होवाळे, अंकुश बडे, वाहन चालक बोरावके यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने पवना नदीतून पुरुषाचा मृतदेह बाहेर काढला.

मृतदेहाची ओळख पटली नाही. मागील काही दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच मृतदेह वाहत आल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.