Pune News : तळजाईच्या जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला तरुणाचा मृतदेह

एमपीसी न्यूज : पुण्याच्या सहकारनगर परिसरातील तळजाईच्या जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळला. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. एका झाडाला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह निदर्शनास आला. मृतदेह काही प्रमाणात सडल्याने मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही. 

प्राथमिक माहितीनुसार, झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे सर्वप्रथम एका नागरिकाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर त्याने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर सहकारनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.

मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख अद्याप पटू शकली नाही. सहकारनगर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.