Talegaon Dabhade News : इंद्रायणीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह मिळाला

एमपीसी न्यूज – कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीत गुरुवारी दुपारी वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह शनिवारी सकाळी मिळाल्याचे वन्यजीव रक्षक मावळचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांनी सांगितले.

ते म्हणाले की, वैभव देसाई नावाचा तरुण परवा इंद्रायणीत वाहून गेला होता. शनिवारी वन्यजीव रक्षक मावळ व तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाच्या पथकांनी कुंडमळा जवळील नदीत शोध घेतला.त्यावेळेस सकाळी 11 ते 11.30 च्या दरम्यान नदी किनाऱ्यावरील झाडीत आम्हाला मृतदेह दिसला.तो मृतदेह वैभव देसाईचा होता.इंद्रायणीचे पाणी  ओसरल्याने तो मृतदेह झाडीत अडकला असावा.

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, गणेश निसाळ, विनय सावंत, भास्कर माळी, अविनाश कार्ले, वैभव वाघ, विशाल जव्हेरी व गणेश गायकवाड यांच्या पथकाने आज शोधकार्य केले.

ताहिर मोमीन, रियाज मुलानी, शेखर खोमणे, धिरज शिंदे, गणेश जावळेकर, आकाश ओहोळ हे तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारिंव्ह्या पथकाने देखील आज शोधकार्य केले.

वैभव देसाई हा खवय्या हॉटेल आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ राहत होता. पण मुळचा तो गोव्याचा होता, असे निलेश गराडे यांनी सांगितले आहे. देसाई हा गुरुवारी सकाळी 3 ते 4 मित्रांबरोबर कुंडमळा येथे वर्षाविहारासाठी आला होता.कुंडमळा हॆ पर्यटनस्थळ देहूरोड व तळेगावदाभाडे या दोन शहरापासूनजवळ आहे. देसाईचा पाय घसरल्याने तो इंद्रायणीत पडून पाण्याच्या तीव्र वेगमुळे वाहून गेला आहे.

वन्यजीव रक्षक मावळचे सदस्य घटनास्थळी पोहोचले होते. तसेच तळेगाव दाभाडे व तळेगाव दाभाडे एम आय डी सी पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी देखील तेथे पोहोचले होते. पण इंद्रायणीतील पाण्याचा खूप वेग असल्याने त्यांना देसाईचा शोध घेता आला नव्हता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.